Pune News | न्या.भगवती इंटरनॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशनचा समारोप; भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मध्ये यशस्वी आयोजन

0

पुणे : Pune News | भारती अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या न्या.भगवती इंटरनॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशनचा समारोप भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अभय ओक,श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.थुराईराज,नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अनिलकुमार सिन्हा,मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.हूसनू अल सुऊद,अलाहाबाद न्यायालयाचे न्या.अरुण कुमार सिंग देशवाल,गुजरात उच्च न्यायालयाचे न्या.अनिरुद्ध पी.मायी,केरळ उच्च न्यायालयाच्या न्या.कु.सोफी थॉमस,न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे यांच्या उपस्थितीत पार पडला.दि.२३ मार्च २०२४ रोजी हा कार्यक्रम एरंडवणे शैक्षणिक संकुलात झाला.’न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे हे बारावे वर्ष होते.

या स्पर्धेत ५० स्पर्धक संघानी सहभाग घेतला .प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,प्रा.शिवांगी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.ख्राईस्ट युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ लॉ(बंगळुरू) ने प्रथम क्रमांक पटकावला.सिम्बायोसिस लॉ स्कुल(पुणे) ला दुसरा क्रमांक मिळाला.बांगलादेशच्या इंडिपेन्डन्ट युनिव्हर्सिटीला बेस्ट इंटरनॅशनल टीम पुरस्कार मिळाला.सिम्बायोसिस लॉ स्कुल(पुणे) ला बेस्ट मेमोरियल पुरस्कार मिळाला.अदिती नायर(लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,लखनौ) ने बेस्ट रिसर्चर पुरस्कार पटकावला.बेस्ट स्पीकर पुरस्कार नाव्या दीक्षित(नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी,भोपाळ) ने मिळविला.अंतिम फेरीत स्पर्धकांना मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.हूसनू अल सुऊद,नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अनिलकुमार सिन्हा,अलाहाबाद न्यायालयाचे न्या.अरुण कुमार सिंग देशवाल,गुजरात उच्च न्यायालयाचे न्या.अनिरुद्ध पी.मायी,केरळ उच्च न्यायालयाच्या न्या.कु.सोफी थॉमस यांच्यासमोर युक्तिवाद करण्याची संधी मिळाली.स्पर्धा आयोजनात मदत करणाऱ्या तारिक खान,दक्षिणा जैन,मुकुल आर्य,विधी राज,अभिषेक सिन्हा यांचे आभार मानण्यात आले.

‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे हे बारावे वर्ष होते.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.पी.एन.भगवती यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ २०११ साली सुरु करण्यात आली.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा नावाजली आहे.मानवी हक्कांच्या संदर्भातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल या स्पर्धेतून जागृती घडवून आणली जाते.भारती विद्यापीठाचे संस्थापक कै.डॉ.पतंगराव कदम,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्यवाह डॉ.विश्वजित कदम,कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता कदम-जगताप,कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.