अभिनेते दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात

0

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला सासवडजवळील हिवरे गावात अपघात झाला आहे. सुदैवाने गाडीतील एअर बॅग्समुळे कोणालाही इजा झाली नाही. हा अपघात मंगळवारी रात्री ११ वाजता घडला.

प्रविण तरडे, अभिनेते रमेश परदेशी, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे बीएमडब्ल्यु गाडीने सासवडहून पुण्याकडे येत होते. त्यावेळी हिवरे गावातील रस्त्यावर महादेव मंदिरासमोर एकदम वळण आहे. रमेश परदेशी हे गाडी चालवत होते. तरडे शेजारी बसले होते. या वळणावर परदेशी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावरुन खाली गेली.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्याबरोबर गाडीतील एअर बॅग्स उघडल्याने कोणाला इजा झाली नाही. अपघाताचे वृत्त समजल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताची नोंद घेतली आहे. त्यानंतर सर्व जण पुण्यात परतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.