FIR On Vishal Surendrakumar Agarwal | पुणे : विशाल अग्रवाल-सुरेंद्रकुमार अग्रवालच्या अडचणीत वाढ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

0

पुणे : – FIR On Vishal Surendrakumar Agarwal | पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणात चर्चेत आलेल्या सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Builder Vishal Agarwal) या बाप-लेकांसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आहे. यामुळे अग्रवाल बाप-लेकाच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.

सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे राहणाऱ्या 41 वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे (वय-38 रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, सीईओ रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर आयपीसी 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची चंदननगर पोलिसांनी दिली.

शशिकांत दत्तात्रय कातोरे (वय-41 रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय साहेबराव कातोरे (वय-69) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. शशिकांत कातोरे यांचा ‘सद्गुरू इन्फ्रा’ या नावाने कन्स्ट्रक्शन व्यवसाय होता. त्यांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज आवश्यक होते. यासाठी ते बँकेच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांची काळे सोबत ओळख झाली. त्याने ‘तुम्ही बँक लोनच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशोबाने पैसे परत करा’ असे सांगितले. शशिकांत यांनी काळे यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात पैसे दिले होते.

मागील काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन बांधकाम साईट सुरु करण्यासाठी काळेकडून पाच टक्क्यांनी पुन्हा पैसे घेतले. मात्र, ही साईट सुरु झाली नाही. त्यानंतर काळे याने रक्कमेवर चक्रवाढ व्याज लावून पैशांसाठी शशिकांत यांच्याकडे तगादा लावला. शशिकांत यांच्या घरी जाऊन त्यांना ‘आम्हाला पैसे दिले नाही तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो’ अशी धमकी दिली. काळे याच्या त्रासाला कंटाळून शशिकांत यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.