Devendra Fadnavis On Police Recruitment | जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली; गृहमंत्री फडणवीसांची माहिती

0

मुंबई: Devendra Fadnavis On Police Recruitment | सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे. परंतु आता या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे.

आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्याठिकाणची चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे.”

दरम्यान, मुसळधार पावसाच्या कारणामुळे पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी तरुणांकडून करण्यात आली होती. आता हीच मागणी मान्य झाल्यामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला १९ जून पासून सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.