Life Term Insurance Tips | पहिल्यांदा खरेदी करत असाल तर लाईफ इन्श्युरंस तर लक्षात ठेवा ‘या’ 4 गोष्टी, वेळोवेळी पडतील उपयोगी

0

नवी दिल्ली : Life Term Insurance Tips | असंख्य पर्याय असलेल्या इन्श्युरंसची खरेदी करणे अवघड असते. अनेक लोक ऑनलाईन मिळालेल्या माहितीमुळे संभ्रमात असतात, अनेकदा ते चुकीच्या सेलला बळी पडतात आणि चुकीच्या माहितीमुळे नुकसान होते. असे होऊ नये यासाठी येथे काही पद्धती दिल्या आहेत, ज्याद्वारे पहिल्यांदा विमा घेताना संभ्रम होणार नाही आणि कोणत्याही त्रासाशिवाय विमा प्लान निवडू शकता –

बजेट आणि गरजांनुसार निवडा विमा

तुमच्या बजेटमध्ये बसणारा इन्श्युरंस निवडा. तुमच्या गरजा, कालावधी, व्यक्तीगत गरजा आणि नॉन-नेगोशिएबल गोष्टींच्या आधारावर आपल्या विमा योजनांना पर्सनलाईज्ड करू शकता.

जीवन विमा म्हणजे टर्म लाईफ इन्श्युरंस

हा कोणाच्याही अवलंबितांसाठी सुरक्षेचा सर्वात चांगला प्रकार आहे. हा इतर प्रकारच्या जीवन विमाच्या तुलनेत स्वस्त आहे, आणि जर तरूणपणात खरेदी करत असाल तर आणखी स्वस्त आहे. सध्या यूएलआयपी (ULIP) आणि एंडोमेंट प्लान जीवन विमा म्हणून विकला जातो, हे बचत + जीवन विमा उत्पादन आहे. पूर्णपणे जीवन विमा नाही. अशी चुकीची विक्री लक्षात घ्या.

कमी वयात खरेदी करा, कमी प्रिमियम द्या

वयाच्या २० अथवा ३० च्या दशकात प्राथमिक टर्म लाईफ इन्श्युरंससोबत प्रिमियमवर ५० टक्के पर्यंतची बचत करू शकता. उदाहरणार्थ, १ कोटी रुपयांच्या कव्हरसोबत ३० वर्षांच्या टर्म लाईफ इन्श्युरंसची किमत ३० वर्षाच्या वयात वार्षिक ७,७८८ रुपये, ३५ वर्षाच्या वयात ९,९१२ रुपये, ४० वर्षाच्या वयात १३,२१६ रुपये आणि ४५ वर्षाच्या वयात १७,७०० रुपये आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हे दर वेगळे असू शकतात.

विश्वासार्ह कंपनीकडून पॉलिसी खरेदी करा

विमा खरेदी करताना विम्याची आणि कंपनीची पूर्ण माहिती घ्या. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जाणून घ्या. मित्र-नातेवाईकांशी चर्चा करा.

तज्ज्ञ सांगतात, भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आपल्या वेबसाईटवर एक रिसर्च कॉर्नर दिला आहे, जिथे उद्योगाचे निकाल, मासिक आकडे, वार्षिक रिपोर्ट आणि विम्याची पुस्तिका यासारखी भरपूर माहिती मिळू शकत. विविध प्रकारचे विमा आणि त्याचे महत्व यासंदर्भात उपयोगी आणि विश्वसनीय संसाधने येथे उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.