Agriculture Infrastructure Fund (AIF) | शेतकऱ्यांना सहज मिळेल कर्ज, सरकारने ‘या’ योजनेचे उदिष्ट वाढवले

0

नवी दिल्ली : Agriculture Infrastructure Fund (AIF) | सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी अ‍ॅग्रीकल्‍चर इन्फ्रास्ट्रचर फंड (एआयएफ) चा निधी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट केला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकते, तसेच, एफपीओ, कृषी उद्योजक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील. (Farmer Loans)

कृषी आणि शेतकरी मंत्रालयानुसार, यावर्षी एआयएफ योजने अंतर्गत कर्जाचे उदिष्ट २५००० कोटी रुपये केले आहे. मागील वर्षी ते सुमारे १७००० कोटी होते. हा निर्णय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी घेण्यात आला आहे.

या योजनेमुळे शेतकरी आणि एफपीओ, कृषी उद्योजक दोन कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकतात. मंत्रालय योजने अंतर्गत कर्ज घेतल्यास व्याजात तीन टक्के सूट देत आहे. अशा प्रकारे दोन कोटी कर्जात ६००००० रुपयांपर्यंत वार्षिक बचत होऊ शकते.

याशिवाय यामध्ये मार्केटमधून कर्ज घेण्यास बँकांना सिक्‍युरिटी द्यावी लागते, परंतु यामध्ये सिक्‍युरिटी सरकारच देते. मंत्रालयाने योजने अंतर्गत कर्ज देण्याची कालमर्यादा ठरवली आहे. कमाल ६० दिवसात बँकेला कर्ज प्रकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे.

कर्ज देण्यासाठी स्वतः कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय मदत करते. ज्यामुळे शेतकऱ्याला बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी https://agriinfra.dac.gov.in/Home या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.