Chandan Nagar Pune Crime News | पुणे: ऑफिसमधून लॅपटॉप, रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांकडून अटक

0

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | ऑफिसचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून लॅपटॉप, मोबाईल (Mobile-Laptop Theft) आणि रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. हा प्रकार 7 जून रोजी मध्यरात्री अडीच ते सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान संघर्ष चौकाजवळ असलेल्या इमारतीच्या पार्किंगमधील ऑफिसमध्ये घडला होता. आदित्य उर्फ बच्चा भारत जाधव (वय-22 रा. प्रितनगर हौसिंग सोसायटी, चंदननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In House Burglary)

या बाबत उमर सिराज मुजावर (वय-29 रा. चंदननगर, पुणे) यांनी बुधवारी (दि.19) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ऑफिसमधून लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केला. त्यानंतर त्याचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दाजीने चोरले मेहुण्याचे दागिने

पुणे : दाजीनेच घरातील दोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 8 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एच.पी. लोहीयानगर (HP Lohiya Nagar Pune) येथे घडला आहे. याबाबत शिवम सुनिल वाघमारे (वय-28 रा. एच.पी. लोहीयानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवम याचे दाजी निलेश तानाजी भवाळ (वय-33 रा. पीएमसी कॉलनी, एच.पी. लोहीयानगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.