Mercedes Car Accident Pune | पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात, भरधाव मर्सिडीज कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

पुणे : – Mercedes Car Accident Pune | पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर (Porsche Car Accident Pune) शहरात अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. एका वृत्तानुसार पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर शहरात अवघ्या 25 दिवसांमध्ये 70 अपघातात 31 जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात (Golf Club Road Pune) झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एका आलिशान मर्सिडीज बेंज गाडीने दुचाकीस्वाराला चिरडले.

केदार मोहन चव्हाण (वय-41 रा. पद्मावती) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे (Nandu Arjun Dhavle) याला ताब्यात घेतले असून येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, केदार चव्हाण हे ईव्ही कुरिअर सर्व्हिसेस येथे कामाला होते. चव्हाण हे स्वारगेट येथून बुकिंग पार्सल घेऊन विमानतळ (Pune Airport) येथे जात होते. चव्हाण येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आले असता पाठिमागून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे स्टिकर (Serum Institute of India) असलेली मर्सिडीज बेंझ कार भरधाव वेगात आली. कारने चव्हाण यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.