Rohit Pawar On Ajit Pawar | पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही; रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला

0

पुणे : Rohit Pawar On Ajit Pawar | पुण्यातील शिवाजीनगर (Shivaji Nagar Pune) भागातील साखर संकुल (Sakhar Sankul) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (Sharad Pawar NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walese Patil), जयंत पाटील (Jayant Patil), राजेश टोपे (Rajesh Tope), रोहित पवार (Rohit Pawar), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यासह अन्य मंडळी देखील उपस्थित होते. त्या बैठकीनंतर राज्यातील अनेक घडामोडींबाबत रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात कोयता गँगच्या (Koyta Gang) घटना वाढल्या आहेत. त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्यात सद्यःस्थितीला मुली, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुंडागर्दी देखील वाढली आहे. रस्त्यावर मुलींना मारले जात आहे.

तर पुण्यात कोयता गँगचे प्रमाण वाढलं असून गुंडांनी धुडगूस घातला आहे. त्यावर पोलीस आयुक्तांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.” तसेच पुणे शहर आणि जिल्ह्याकडे पालकमंत्री यांचे लक्ष नसल्याचे सांगत अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.