Kalyani Nagar Car Accident Pune | अल्पवयीन मुलाला जामीन नाहीच; 12 जून पर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा कोर्टाचा आदेश

0

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघातात आरोपी असलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board (JJB) सुरुवातीला काही अटींच्या आधारे जामीन दिला होता. त्यावरून विविध स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला. त्यांनतर पोलिसांनी (Pune Police) नव्याने कलमाची वाढ करत पुन्हा त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता त्याला ५ जून पर्यंत बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपली. (Porsche Car Accident Pune)

आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केले असता दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. पोलिसांनी मुलाला आणखी १५ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुलाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अशा प्रकारे शिक्षा रिपीट करण्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाहीये असे ते म्हणाले. तसेच त्याचे आई, वडील, आजोबा पोलीस कोठडीत असल्याने त्याच्यावर मानसिक परिणाम होईल असे वकिलांनी सांगितले.

यावरून पोलिसांनी आपली बाजू मांडत काही मुद्दे मांडले. त्याला पहिला जामीन मिळाला तेव्हाच तीन गुन्हे घडले होते. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आता देखील तसे होऊ शकते अशी भीती यावेळी कोर्टासमोर पोलिसांनी व्यक्त केली. विशेष न्यायालयाचे न्यायधीश एम जे चौहान यांनी अल्पवयीन मुलाचा मुक्काम १२ जून पर्यंत बाल सुधार गृहात वाढवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.