Dr Eknath Pawar – Sassoon Hospital | ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. एकनाथ पवार; वैद्यकीय शिक्षण विभागाचे आदेश

पुणे : Dr Eknath Pawar – Sassoon Hospital | पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Car Accident Pune) आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरबदल (Blood Sample Tampering Case Pune) केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के (Dr Chandrakant Mhaske) यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. आता डॉ. म्हस्के यांच्या जागी जे जे रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले आहेत.
पोर्शे कार अपघातांनंतर ससून येथील अधिष्ठाता बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. डॉ. पवार मागील वीस वर्षांपासून शासकीय सेवेत असून ९ वर्षे ते जे जे मध्ये ऑर्थोपेडिक विभागात कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशान्वये मी शुक्रवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.