Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांची पुणेकरांना ग्वाही, पीएमपीचा प्रवास आनंददायी करणार; 500 सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू

0

पुणे : Murlidhar Mohol | वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाइट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात महायुतीचे भाजपाचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना पीएमपीचा प्रवास अधीक आनंददायी करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच पाचशे सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मोहोळ यांनी उपस्थितांना दिली. (Pune Lok Sabha)

मुरलीधर मोहोळ यांच्या या प्रचारफेरीत आमदार सुनील कांबळे, बाबू वागस्कर, कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर, मकरंद केदारी, दिनेश होले, सागर गव्हाणे, कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, तात्या शेंडकर, मारुती भद्रावती, नीलेश अशोक कांबळे, दिलीप जांभूळकर, प्रसाद चौघुले, मनोज चोरडिया, निशा कोटा, अतुल वानवडीकर, दिनेश सामल सहभागी झाले होते.

यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबाबत नागरिकांना आश्वस्त करताना म्हटले की, जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा, यासाठी कटिबद्ध आहे.

मोहोळ म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या फेम २ योजनेंतर्गत १५० ई-बसेस मिळाल्या आहे.

मोहोळ म्हणाले, अपेक्षित ६५० ई-बसेसपैकी ४७३ बसेसचा वापर सुरू झाला आहे. उर्वरित बसेस लवकरच येतील. शहराच्या चारही दिशांना सहा ई-बस चार्जिंग डेपो कार्यान्वित केले आहेत. पाचशे सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

इलेक्ट्रिक बसेसचे फायदे सांगताना मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात ७० टक्के तर कार्बन उत्सर्जनात ५० टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देणार आहे, असे मोहोळ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.