Cheating Fraud Case Pimpri | पिंपरी : कमिशनची रक्कम विभागून न देता इस्टेट एजंटची आर्थिक फसवणूक

0

पिंपरी : – Cheating Fraud Case Pimpri | पाच एजंटनी एका कंपनीची 305 एकर जमीन विकली. जमीन विक्री केल्यानंतर मिळालेल्या कमिशनची विभागणी न करता सहकारी एजंटची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार जानेवारी 2011 ते एप्रिल 2024 दरम्यान चिंचवड येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे घडला आहे.

याबाबत इस्टेट एजंट गुरुप्रसाद बिलोचनराम जैयस्वाल (वय-63 रा. कोळीवाडा, वासुंद्री रोड, मांडा टिटवाळा (पश्चिम) ता. कल्याण जि. ठाणे) यांनी रविवारी (दि.5) चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रवीण रमेश साळवे, रमेश साळवे, प्रेमचंद बाफना, सादिक पाशा, के विश्वनाथ आणि अरविंद जैन यांच्या विरोधात आयपीसी 406, 409, 420, 120(ब), 506(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीपीएल कंपनीची मावळ तालुक्यातील मौजै जांभुळ येथे 305 एकर जमीन आहे. या जमिनीच्या व्यवहारात कंपनीचे प्रतिनिधी के. विश्वनाथ आणि जमिन खरेदी करणारे अरविंद जैन यांनी फिर्य़ादी व त्यांच्या सहकाऱ्यांना व्यवहार झाल्याची माहिती न देता विश्वासघात केला आहे. फिर्यादी व त्यांच्या चार जणांनी इस्टेट एजंट म्हणून काम केले.

आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी जमिनीच्या व्यवहारापोटी मिळालेले फिर्यादीच्या हश्श्याचे कमिशन 18 कोटी 25 लाख रुपये त्यांना विभागून न देता आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी व त्यांच्या सहकारी यांनी मागील दहा वर्षापासून त्यांच्या हक्काचे कमिशनचे पैसे मागितले. त्यावेळी आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक झिंजुडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.