Baramati Lok Sabha | बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस, अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप, तक्रार दाखल, रोहित पवारांनी शेयर केले व्हिडिओ, पीडीसी बँक रात्री बारा वाजताही सुरू (Video)

0

पुणे : Baramati Lok Sabha | बारामतीत काल मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलीस बंदोबस्तात अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) मतदारांना पैशाचे वाटप केल्याचा आरोप शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. तसेच रात्री बारानंतर देखील पीडीसी बँक (PDCC Bank) चालु होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंबंधीचे व्हिडिओ एक्सवर पोस्ट केले आहेत. तसेच बारामतीमध्ये पैसे वाटपाच्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये अजित पवार गटातील आणि शरद पवार गटातील कार्यकत्र्यांमध्ये वादावादी सुरू असल्याचे दिसत आहे. तिथे पोलीसही दिसत आहेत. एका कारमध्ये ठेवलेले पैसेदेखील व्हिडीओत दिसत आहेत.

हे व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी एक्सवर लिहिले आहे की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस… यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडीओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहेत. यासाठीच पाहीजे होती का वाय दर्जाची सुरक्षा? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच रोहित पवार यांनी बारामतीमधील वेल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज रात्री १२ वाजले तरी चालू असल्याचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. याबाबत रोहित पवार यांनी लिहिले आहे की, पीडीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडले आहे. रात्रीचे १२ वाजले तरी बँक चालू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम चालू असावा.

Leave A Reply

Your email address will not be published.