Sunil Tatkare | शरद पवारांसोबत हॉटेलमधील भेटीच्या वृत्तावर सुनील तटकरे संतापले, म्हणाले विकृतपणा थांबवा…

0

नाशिक : Sunil Tatkare | माझी शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटलांची (Jayant Patil) भेट होण्याचे काही कारण असू शकत नाही. रस्त्यावरचा प्रवास करत असताना मी फार लांबून नाशिकमध्ये पोहोचलो होतो. माझी पुढची मीटिंग तेथे होती. कार्यकर्ता गाडीमध्ये होता, त्याला विचारले इथे वॉशरुमची सोय आहे का? तिथे मी गेलो. ३-४ मिनीटे थांबलो. तिथे हेमंत टकलेंचा (Hemant Takle) कार्यकर्ता भेटला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार नाशिकमध्ये (Nashik) ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, तिथे खासदार सुनील तटकरे येऊन गेले, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला होता. यामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, देशमुखांच्या या वक्तव्यावर तटकरे यांनी वरील संतप्त प्रतिक्रिया दिली.

सुनील तटकरे म्हणाले, पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज निघत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर जाऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी अनिल देशमुख सुद्धा आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रीपद हवे होते. भाजपने त्यांना नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख राहिलेले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या वक्तव्याला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात ओळखले जात नाही. आमच्यावर जे ७० हजार कोटींची आरोप केले जात होते, त्याला आज फडणवीसांनी फुल स्टॉप दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.