Devendra Fadnavis | निकटवर्तीय नेत्यांवर देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ जबाबदारी, बारामती, माढा, सोलापूर मतदारसंघावर विशेष लक्ष
मुंबई : Devendra Fadnavis | राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील काही नेत्यांवर लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दृष्टीने अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपाने ११ लोकसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. यामध्ये बारामतीची (Baramati Lok Sabha) जबाबदारी मेधा कुलकणी (Medha Kulkarni) यांच्यावर तर माढा (Madha Lok Sabha) आणि सोलापूरची (Solapur Lok Sabha) जबाबदारी आपल्या खास मर्जीतील नेते अनुक्रमे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही नेते ७ मेपर्यंत मतदारसंघात तळ ठोकून रणनीती आखतील.
माढा आणि सोलापूरमध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) संपूर्ण चित्र बदलवून टाकले आहे. सुरूवातील या दोन्ही ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा असल्याचे दिसत होते. मात्र, माढा आणि सोलापुरात शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी वातावरण बदलवून टाकले आहे.
शरद पवार यांनी मोहिते-पाटील घराण्याला आपल्या बाजूला वळवल्याने माढा आणि सोलापूरमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला भाजपसाठी सहजसोपी वाटणारी ही लढाई आता अवघड होऊन बसली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी या जागांकडे विशेष लक्ष देण्यासाठी आपल्या खास शिलेदारांची नेमणूक केली आहे.
माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यात लढत आहे. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात लढाई होणार आहे.
माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस रविवारी एकाच दिवसात माढा, सांगोला, अकलूज येथे तीन सभा घेणार आहेत.
२९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. मागील काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण बदलून टाकले आहे. त्यामुळे माढा आणि सोलापूरमध्ये पुढील काही दिवस राजकीय वातावरण तापणार आहे. यासाठीच भाजपाने आपल्या काही प्रमुख नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
१. रायगड – प्रवीण दरेकर
२. रत्नागिरी सिंधदुर्ग – रविंद्र चव्हाण
३. धाराशिव – अजित गोपछडे
४. लातूर – प्रताप पाटील चिखलीकर
५. बारामती – मेधा कुलकर्णी
६. कोल्हापूर – धनंजय महाडिक
७. हातकणंगले – डॉ. अनिल बोंडे
८. सांगली – भागवत कराड
९. सातारा – विक्रांत पाटील
१०. माढा – प्रसाद लाड
११. सोलापूर – श्रीकांत भारतीय