Tadipar Notice To Sudhakar Badgujar | ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना पोलिसांची तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरण भोवलं

0

नाशिक : – Tadipar Notice To Sudhakar Badgujar | लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना ठाकरे गटाला (Shivsena UBT) मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. परंतु सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाशिकमधून (Nashik Lok Sabha) पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्याने ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सलीम कुत्ता डान्स प्रकरणी (Salim Kutta Dance Video) बडगुजर हे नाव राज्यभर गाजले होते. ऐन निवडणुकीच्या काळात बडगुजर यांना नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्ह आहेत.

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सलीम कुत्ता याच्या नाशिक येथील फार्महाऊसवर त्याने लग्न केल्याचाही आरोप आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलेली. नाशिक मधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यांसोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळून आले. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते. हा मुद्दा दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.