Bibvewadi Pune Crime News | पुणे : वाहन तोडफोड प्रकरणात बिबवेवाडी पोलिसांकडून चार जणांना अटक (Video)

0

पुणे : – Bibvewadi Pune Crime News | बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles) केल्याची घटना घडली. बिबवेवाडी सुपर परिसरात गुरुवारी (दि.25) रात्री अकराच्या सुमारास पार्क केलेल्या वाहनांवर कोयत्याने मारुन तोडफोड करण्यात आली. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह (Criminal On Police Records) चार जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत धोंडिराम महादेव रावळ (वय-53 रा. सुपर पाण्याचे टाकीजवळ, बिबवेवाडी, पुणे) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम नंदकिशोर सगरे उर्फ खोबरे, रवि आनंद चव्हाण, मुकेश मराठे, आशिष पाखरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर अनोळखी आरोपींवर आयपीसी 141, 143, 147, 148, 149, 506(2), 504, 427, 4(25)क, 37 (1) (3) 135म 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी हातामध्ये कोयता, लाकडी बांबु, हॉकी स्टीक घेऊन सुपर बिबवेवाडी येथील नवचैतन्य मित्र मंडळ येथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या रिक्षाची समोरील काच फोडली. तसेच चारचाकी गाडीची काच फोडली. तर रिक्षाच्या मागे उभ्या केलेल्या रिक्षांच्या काचा फोडून दुचाकींची तोडफोड करुन नुकसान केले. आरोपींनी हत्याराचा धाक दाखवत ‘आम्ही इथले भाई आहे, हा आमचा एरीया आहे, मध्ये कोण पडल्यावर एका-एकाला जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.