Pune Lok Sabha-Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी एकदिलाने मैदानात : बाळा नांदगावकर

0

पुणे : Pune Lok Sabha-Murlidhar Mohol | पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पहिली सभा भाजपा नेते नारायण राणे यांच्यासाठी कोकणात झाली होती. आता दुसरी सभा महायुतीचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात होत आहे. ही सभा उद्या १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

सभेची माहिती देताना बाळा नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील सारसबाग परिसरात उद्या सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले.

बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.