Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना अटक

0

पुणे : – Pune Dhankawadi Crime | बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन घर नावावर करुन घेत फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार मे 2022 ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत धनकवडी मधील हत्ती चौकातील (Teen Hatti Chowk) Dhankawadi) चाळ नंबर सी/6/14 येथे घडला आहे.

याबाबत तानाजी नामदेव पांगरे (वय-76 रा. चाळ नंबर सी/6/14, हत्ती चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. यावरुन अंबादास सुर्यवंशी, नरसिंह सुर्यवंशी (दोघे रा. मार्केट यार्ड रोड, आंबेडकर नगर), प्रभाकर इंगळे (रा. गोखलेनगर, लाल चाळ, पुणे) यांना अटक केली आहे. तर मुकेश जाधव (रा. आंबेडकर नगर) याच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471, 182, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंबादास याने फिर्यादी यांचे धनकवडी येथे असलेल्या घऱाचे कुलमुखत्यार पत्र भाऊ नरसिंह याच्या नावाने तयार करुन घेतले. यावर मुकेश जाधव व प्रभाकर इंगळे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. आरोपींनी संगनमत करुन कुलमुखत्यारपत्रावर फिर्य़ादी यांचा फोटो लावून खोटे व बनावट कुलमुखत्यार पत्र बनवून घेतले.

तसेच त्यावर फिर्यादी यांची खोटी सही व अंगठा उठवला. फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केलेल्या कॅश व्हावचरवर 20 लाख रुपये रोखीने देऊन घर घेतल्याची कागदपत्रे तयार केली. आरोपींनी घर नावावर करुन घेतल्याचे फिर्य़ादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे (PI Uttam Bhajanawale) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.