Pune Koregaon Park Crime | तरुणीकडे पाहून रिक्षाचालकाचे अश्लील हातवारे, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

29th March 2024

पुणे : – Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क परिसरात महिलांसोबत छेडछाड करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सोमवारी रात्री रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील कमेंट (Obscene Comment) करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) तरुणीकडे पाहून अश्लील हातवारे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे (Molestation Case). हा प्रकार रविवारी (दि.24) रात्री सात ते आठच्या दरम्यान हॉटेल माउटंनगोट (Hotel Mountain Goat), लेन नं. 6 येथे घडला आहे.

याबाबत चंदननगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.28) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी रिक्षाचालकावर आयपीसी 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लेन नं.6 येथील हॉटेल माउटंनगोट येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ससुन रुग्णालयातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

पुणे : ससुन रुग्णालयत (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केलेली 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्ड नंबर 21 मध्ये घडला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी यांनी 14 वर्षाच्या मुलीला ससुन हॉस्पिटलमधील वॉर्ड नं. 21 येथे तपासणी करण्यासाठी दाखल केले होते. मुलगी उपचार घेत असताना ती अचानाक कोणालाच काहीही न सांगता निघून गेली आहे. तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.