Pune Court News | पुणे : आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

0

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | शतावरी वनस्पतीची रोपे विकून त्यातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्याची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यतील आरोपी माधव निवृत्ती गायकवाड (Madhav Nivritti Gaikwad) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे (Judge A.S. Waghmare) यांनी अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजुर केला आहे.

आरोपी माधव गायकवाड याने एका शेतकऱ्याला शतावरी वनस्पतीच्या रोपांची विक्री केली. पीक मोठे झाल्यानंतर ते आम्ही खरदे करु. यातून तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळेल, असे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये आरोपीने ॲड. विजय विठ्ठलराव पवार (Adv. Vijay Vitthalrao Pawar) व ॲड.देवांशी अतुल बुरांडे (Adv. Devanshi Atul Burande) यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. वकिलांचा प्रभावी युक्तिवाद मान्य करत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाघमारे यांनी आरोपीला 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणांमध्ये आरोपीतर्फे ॲड.विजय पवार व ॲड. देवांशी बुरांडे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.