Pune Crime News | पुणे : सराफा व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून 19 लाखांचे दागिने केले लंपास, घटना CCTV मध्ये कैद

0

पुणे : – Pune Crime News | चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने (On the pretext of taking a silver idol) दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून सहकाऱ्याने दुकानातील ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी दुकानातून 19 लाख 18 हजार 350 रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना येरवडा बाजार (Yerawada Bazar) येथील महावीर ज्वेलर्स येथे घडली आहे.

याप्रकरणी राकेश गोपीलाल जैन (वय-44 रा. नीता पार्क कोपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विमानतळ रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.8) रोजी सकाळी अकराच्या सुमारास महावीर ज्वेलर्स येरवडा बाजार येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत. फिर्यादी हे सकाळी अकराच्या सुमारास एकटे असताना सहा चोरटे सोने खरेदीच्या बाहण्याने महावीर ज्वेलर्स मध्ये आले. यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले.

त्यामुळे जैन काऊंटरवरुन उठून बाजूला असलेल्या शोकेस मधील मूर्ती दाखवायला गेले. चोरट्यांनी मूर्ती पाहिल्या मात्र ते काही घेतल्या नाही. दरम्यान, फिर्यादी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याच्या 9 अंगठ्या असा एकूण 19 लाख 18 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.