Pune Police News | पुणे : अपंग व्यक्तीला मदत करुन पोलिसांनी दाखवली ‘खाकी’तली माणुसकी!

0

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव आतापर्यंत अनेकांना आला आहे. पुणे वाहतूक शाखेत (Pune Traffic Police ) कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी नितू जाधव यांनी अपंग व्यक्तीला मदत करुन माणुसकी दाखवली. हा प्रकार गुरुवारी (दि.28) सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवर (FC Road Pune) घडला.

गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने एफसी रोडवर नकळत नो पार्किंगमध्ये गाडी लावली. त्यामुळे डेक्कन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडीला जामर लावून कारवाई केली. त्यानंतर गाडीचा चालक त्याठिकाणी आल्यावर त्याला जामर लावल्याचे दिसून आले. त्याने वाहतूक पोलिसांना फोन केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी नितू जाधव या गाडीजवळ आल्या. त्यांनी चालकाला रितसर ऑनलाईन पावती फाडण्यास सांगितले.

चालकाने गाडीत अपंग रुग्ण असल्याची माहिती नितू जाधव यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वत: गाडीतून खाली उतरुन अपंग व्यक्ती विचारपूस केली. तसेच दंडाची पावती न फाडता चालकाला गाडी घेऊन जाण्यास सांगितले. मार्च एडिंग असताना वाहतुक पोलिसांकडून दंड वसुल करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.

मात्र, पोलीस कर्मचारी नितू जाधव यांनी गाडीतील अपंग व्यक्तीची अवस्था पाहून त्यांना सोडून देत माणूसकी दाखवली. याबाबत अपंग व्यक्तीने व वाहन चालकाने नितू जाधव यांचे आभार मानून तुमच्या हातून सेवा देश सेवा घडत राहो अशी ईच्छा व्यक्त केली. नितू जाधव यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.