Pune PMC News | सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे बिले सादर करण्यासाठी ठेकेदारांचा रात्री महापालिकेत मुक्काम

0

पुणे : Pune PMC News | महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) आर्थिक वर्ष रविवार ३१ मार्चला संपत आहे. परंतू शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टया असल्याने आज महापालिकेमध्ये कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांनी (PMC Contractor) गर्दी केली होती. परंतू सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी आणि स्लो इंटरनेटमुळे आलेल्या अडचणींमुळे ठेकेदारांसह कर्मचार्‍यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत आहे. अशातच आज गुरूवारी शेवटचा वर्कींग डे असल्याने मागील काही महिन्यांत महापालिकेची विविध कामे केलेले ठेकेदारांनी बिले सादर करण्यासाठी महापालिकेत गर्दी केली होती. परंतू दिवसभरामध्ये साधारण पाच ते सहा वेळा वीजेचे ये जा सुरू होते. यामुळे इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचणी येत होत्या. यंदा प्रथमच महापालिकेने तयार केलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये बिले सादर करायची असल्याने इंटरनेटमधील अडचणींमुळे व्यत्यय येत होता. तसेच सॉफ्टवेअरमध्येही काहीना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. अशातच संध्याकाळी उशिरापर्यंत महापालिकेने कुठलिच मुदतवाढ न दिल्याने अनेकांना रात्री उशिरापर्यंत बिले सादर करण्यासाठी थांबून राहावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.