Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार व सात लाखांची फसवणूक

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित करून, नंतर लग्नाला नकार दिला. तसेच तिच्याकडून 7 लाख रुपये उकळले (Cheating Fraud Case). हा प्रकार मार्च 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत हडपसर, हैदराबाद, हिंजवडी व पिंपरी-चिंचवड येथे घडला. (Pune Rape Case)
याप्रकरणी 31 वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद अबरार इब्राहिम शेख Mohammad Abrar Ibrahim Shaikh (वय 35, रा. बंजारा हिल्स, सय्यदनगर, आसिफ नगर, हैदराबाद) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 417, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Hadapsar Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले होते.
फिर्यादीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले तसेच पीडितेकडून वेळोवेळी 7 लाख रुपये देखील घेतले.
फिर्यादी यांनी आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. तसेच पैसे मागिल्यावर मारहाण केली.
पीडितेला हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत.
Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग
Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक