Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

0

3 वर्षांसाठी 45 लाख रुपयांची होणार मदत

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) सिकंदर शेख (Sikander Shaikh) यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार झाला असून ‘पुनीत बालन ग्रुप’ महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. या करारानुसार पुनीत बालन ग्रुप सिकंदर शेखला ३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची मदत करणार आहे. (Punit Balan Group (PBG) )

देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ कायमच विविध खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत करार करून पुनीत बालन ग्रुपच्यावतीने त्यांच्या करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. नुकताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि राज्यभर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम असलेला सिकंदर शेखचा यांच्या करिअरसाठीही हातभार लावण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे. त्यानुसार युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan) यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकंदर शेख यांनाही खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर सिकंदर शेख यांचेक आता हिंद केसरी होण्याचे आणि ऑलम्पिक स्पर्धेत (Olympic Games) देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ततेची सोनेरी झालर लावण्यासाठी या सहकार्याचा निश्चित उपयोग होईल.

सिंकदर शेख यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं त्यांचं हिंद केसरी (Hind Kesari) होण्याचं आणि ऑलम्पिक स्पर्धेतून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगातही झळकेल आणि हाच ‘पुनीत बालन ग्रुप’साठी मोठा सन्मान ठरेल.

  • पुनीत बालन, युवा उद्योजक

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांच्या सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार, अखेर समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय

PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Pune Metro | वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Leave A Reply

Your email address will not be published.