Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | हडपसर परिसरातील सातववाडी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिल्याने तिला भररस्त्यात आडवून अंगवार अॅसिड फेकण्याची धमकी (Acid Attack Threat) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च 2020 पासून ते 11 मार्च 2024 या कालावधीत सातववाडी (Satavwadi) येथील सासवड रोडवर (Saswad Road) घडला आहे. (Molestation Case)

याबाबत सातववाडी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित मुलीने बुधवारी (दि.13) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश शरद मोहिते Ganesh Sharad Mohite (वय-25 रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, सातववाडी, हडपसर) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 341, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी ऐकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी मार्च 2020 पासून पीडितेचा वारंवार पाठलाग करुन तिला रस्त्यात आडवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच वेगवेगळ्या मोबाईल क्रामांकावरुन तिला फोन करुन त्रास देत होता. सोमवारी (दि.11) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रीणीसोबत सासवड रोडवर पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती.(Pune Hadapsar Crime)

त्यावेळी आरोपीने मुलीला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत रस्त्यात आडवले. तिच्यासोबत अश्लील बोलून धमकी दिली. तसेच तु जर माझ्यासोबत बोलली नाही तर तुला मारुन टाकेन. नाहीतर तुझ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली.
तसेच याबाबत कोणालाही सांगितले तरी माझे कोणीच काही करु शकत नाही असे म्हणत मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे (API Varsha Dongre) करीत आहेत.

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांच्या सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार, अखेर समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय

PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Leave A Reply

Your email address will not be published.