Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Khadak Crime | शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉलेज, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना भररस्त्यात अडवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशीच एक घटना खडक पोलीस स्टेशनच्या (Khadak Police Station) हद्दीत घडली आहे. ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2023 ते 19 फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी किराड हौद परसिरातील एका क्लास च्या समोर घडला आहे. (Molestation Case)

याबाबत नाना पेठेत राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.20) खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन यशराज दिनेश पाटोळे (रा. गंजपेठ, सावधान मंडळा शेजारी, पुणे) याच्यावर आयपीसी 354(अ), 354(ड), 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Khadak Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलगी किराड हौद परिसरात एका क्लासला जाताना व येताना आरोपी रस्त्यात थांबून तिच्याकडे पाहत होता. याबाबत मुलीने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तु मला आवडतेस असे म्हणत मोबाईल नंबर मागितला. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान आरोपीने त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मुलीला देऊन फोन करण्यास सांगितले.

फोन केला नाही तर तुझ्या घरी येवुन तमाशा करेल अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आरोपीला फोन केला असता
त्याने भेटण्यासाठी बोलावले. मात्र, तिने भेटण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने तिला भररस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करुन लगट करण्याचा प्रयत्न करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.

या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली होती. मुलगी घाबरल्याचे पाहून तिच्या वडिलांनी मागील अनेक दिवसांपासून तू टेन्शनमध्ये का आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितले. त्यांनी आरोपीच्या नंबरवर फोन केला असता, त्याने मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवकर करीत आहेत.

Pune Lashkar Crime | पुणे : बलात्काराची तक्रार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, 5 सराईत गुन्हेगारांना अटक

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.