Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police News | रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल (Mobile Theft) जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी (Robbery In Pune) केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) अटक केली आहे. तर दोन अल्पयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मनपा येथील ब्रिजखाली करण्यात आली.

चंदु नंदू सरोदे (वय-19 रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा), सिद्धेश विश्वास शेंडगे (वय-18 रा. सेवक चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी तक्रारदार यांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 392,34 सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या एका दुचाकी तिच्यावरील खुणे मुळे निश्चित केली. तसेच पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, रुपेश वाघमारे यांना माहिती मिळाली की आरोपी मनपा येथील ब्रिजखाली येणार आहेत. पथकाने सापळा रचला असता आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल, दोन कोयते, दोन दुचाकी असा एकूण एक लाख 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (IPS Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार राजकिरण पवार, रुपेश वाघमारे, सुदाम तायडे, प्रविण धडस, आदेश चलवादी, महिला पोलीस शिपाई स्वालेहा शेख यांच्या पथकाने केली.

Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.