Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police Crime Branch | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी (IPS Amitesh Kumar) पुणे शहरात ड्रग्ज तस्करांवर (Drug Peddler) कारवाई करुन त्यांची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील गोदामातून 55 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. त्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी (Kurkumbh MIDC) येथील अर्थकेम या केमीकल कंपनीवर छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन जप्त केले. याच दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने राजधानी दिल्लीत (Pune Crime Branch Raid In Delhi) छापेमारी करुन 400 किलो एमडी Mephedrone (MD) जप्त केले आहे. पोलिसांनी आतापर्य़ंत 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने कुरकुंभ येथील कंपनीत छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त एमडी जप्त केले. या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य 1 हजार 440 कोटी रुपये आहे. ही व्याप्ती आणखी वाढणार असून दोन हजार कोटींच्या घरात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कंपनीमध्ये 1800 किलो ‘एमडी’च्या निर्मितीचे टार्गेट ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले सॅम व ब्राऊ नावाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके दिल्लीला रवाना करण्यात आली होती. तर काही पथके मुंबईला रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, डोंबिवलीमधून एका ‘केमिकल एक्स्पर्ट’ला ताब्यात घेण्यात आले आहे.

या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी आहेत. भारतात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालविणारे ‘टॉप’चे तस्कर यामध्ये सहभागी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पकडण्यात आलेल्या ‘एमडी’पैकी हे सर्वात ‘सुपर फाईन क्वालिटी’चे ‘एमडी’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुरकुंभ येथे तयार झालेले हे ‘एमडी’ मुंबई, मीरा भाईंदर, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्गे विदेशात जाणार होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली कनेक्शन समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने दिल्लीत छापे टाकून 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी 1100 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य 2200 कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणात आणखी ड्रग्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनिल तांबे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.