Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch News) सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करुन 500 किलो मेफेड्रॉन (एमडी – MD) ड्रग्ज जप्त (Mephedrone Drugs Seized) केले आहे. ही कारवाई कुरकुंभ एमआयडीसी मधील एका केमीकल कंपनीत केली. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांमध्ये तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. अनिल साबळे नावाच्या कारखाना मालकाला पोलिसांनी डोंबिवली इथून सकाळी ताब्यात घेतले आहे.(Pune Police News)
दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये 55 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. त्यानंतर कुरुकुंभ एमआयडीसी मधील केमीकल कंपनीत छापा टाकून एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या तिघांना सोमवारी अटक करून, त्यांच्या ताब्यातून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. मिठाच्या गोदामातून हे अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट सुरू होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सायंकाळपर्यंत वेगाने तपास करुन तब्बल 55 किलो ‘मेफेड्रोन’ जप्त केले. पुण्यातील विश्रांतवाडी भागात असणाऱ्या भैरवनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतीश
गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे.
Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले