Pune Kharadi Crime | पुणे : पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चार जणांना अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Kharadi Crime | मागिल काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये गाड्यांची तोडफोड व जाळपोळ करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चंदननगर परिसरात पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.17) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील तुकाराम नगर येथे घडला आहे.

याबाबत महेश रमेश राजे (वय-28 रा. तुकाराम नगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगार धिरज दिलीप सपाटे (वय-25 रा. तुकारामनगर, खराडी), आकाश सोकीन सोदे (वय-23 रा. चंदननगर), नयत नितीन गायकवाड (वय-19 रा. सानाथनगर, वडगाव शेरी), सुरज रविंद्र बोरुडे (वय-23 रा. उबाळेनगर, वाघोली), विशाल राजेंद्र ससाने (वय-20 रा. वाघोली मुळ रा. मु.पो. तांडोळी जि. पाथर्डी) यांच्यावर आयपीसी 307, 427, 435, 308, 143, 147, 148,149 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी धिरज सपाटे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकाच परिसरात राहत असून शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास धिरज सपाटे हा त्याच्या इतर 13 साथीदारांना पाच दुचाकीवरुन घेऊन आला. गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या चारचाकी नेक्सॉन गाडीच्या (एमएच 12 टीएच 7277) समोरील व साईडच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. या गाडीच्या पुढील सिटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्याचवेळी फिर्यादींची भाडेकरु असणाऱ्या वर्षा दयाराम गायकवाड या घराच्या बाहेर आल्या असता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्या तिथून पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपींनी तिथेच उभी असलेल्या पल्सर गाडीची (एमएच 12 एमजी7272) टाकी फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले होते. त्यावेळी आरोपी धिरज सपाटे याने कोणी मध्ये आला तर तुम्हांला सोडणार नाही असे धमकी दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील
यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चार जणांना अटक केली आहे.
तर मुख्य आरोपी धिरज सपाटे याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे करीत आहेत.

Pune CP Amitesh Kumar | वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यांविरोधात ‘विशेष मोहीम’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

ACP Mugutlal Patil | सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरुन पाच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.