Pune Mundhwa Crime | फेसबुकद्वारे मैत्री करुन तरुणीवर बलात्कार, मुंढवा परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Mundhwa Crime | फेसबुकद्वारे मैत्री (FB Friend) करून मुलीवर वेळोवेळी बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016 ते 28 जानेवारी या कालावधीत वानवडी, लोणावळा, वडकी, हडपसर, कोरेगाव पार्क येथे घडला आहे.

याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.6) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन चंदर मुट्टल (वय-22 रा. मुत्तलवाडी, पाटण, जि. सातारा) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील चेतन मुट्टल याने पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या 20 वर्षीय मुलीसोबत 2016 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.

Pune Cheating Fraud Case | पुणे : प्लॉटींगच्या व्यवसायात पावणे दोन कोटींची फसवणूक, 12 जणांवर FIR
Pune Pimpri Chinchwad Crime News | तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.