Loni Kalbhor Pune Crime | पुणे : मित्राकडून तरुणीसोबत अश्लील कृत्य, फोटो व्हायरल करण्याची धमकी

0

पुणे : – Loni Kalbhor Pune Crime | तरुणीसोबत मैत्रीकरुन तिला फिरायला नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य (Obscene Act) करुन फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मोबाईलमधील फोटो व व्हिडीओ डिलीट करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या दोन भावांना सहा जणांनी काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार फेब्रुवारी 2020 पासून सोमवार (दि.29 एप्रिल) दरम्यान हवेली तालुक्यातील होळकर वाडी (Holkarwadi) येथे घडला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Rape Case)

याबाबत 19 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.30 एप्रिल) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन महेश सुनील खरात Mahesh Sunil Kharat (वय-24), मंगेश सुनील खरात Mangesh Sunil Kharat (वय-20), सुनील खरात (वय-50), प्रशांत खरात (वय-24) व दोन महिला (सर्व रा. होळकर वाडी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध आयपीसी 376, 354, 324, 323, 506, 34 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश खरात याने पीडित मुलगी अल्पवयीन असताना 2020 मध्ये मैत्री केली. मुलीला फिरण्यासाठी उरुळी देवाची येथील पिंजन वस्तीतील रानमळा येथे घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीसोबत अश्लील चाळे करुन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलीचा वारंवार पाठलाग करुन शरिरसुखाची मागणी केली. आरोपीच्या या कृत्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले.

आरोपी महेश याने मुलीकडे शरीरसुखाची मागणी करुन संबंध प्रस्तापित केले नाही तर तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीच्या मोबाईलमध्ये असलेले मुलीचे फोटो डिलीट कर असे सांगण्यासाठी तिचे दोन भाऊ आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपींनी मुलीच्या दोन्ही भावांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.