Sharad Pawar | शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या; मोठा अनर्थ टळला!

0

जळगाव : – Sharad Pawar | शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कनगाव जवळ घडली. अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. चोपडा येथून सभा संपवून ते भुसावळ कडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. ताफ्यामागे चालणाऱ्या गाड्या धडकल्या. यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे. स्पिड ब्रेकरवर शरद पवार यांची गाडी स्लो झाल्यानंतर मागे वेगात असलेल्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.

यापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी जाणारे हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये चढण्याआधी ते कोसळले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी साडेनऊ वाजता अंधारे या बारामतीच्या दिशेने जात होत्या. अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.