Pune Pimpri Chinchwad Crime News | तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करुन त्यांचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार कोंढवा परिसरातील एका सोसायटीतील पार्किंगच्या मोकळ्या जागेत 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ आणि रविवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास घडला आहे. ( Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने सोमवारी (दि.5) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सावेज हासीम (वय-31 रा. मिठानगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच सोसायटीत राहतात. शुक्रवारी (दि.2) रात्री साडे आठच्या सुमारास फिर्यादी यांची 9 वर्षाची मुलगी तिच्या 10 वर्षाच्या दोन मैत्रिणीसोबत सोसायटीतील पार्किंगच्या मोकळ्या जागेत खेळत होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्य़ादी यांच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रिणीसोबत गैरवर्तन केले. यानंतर रविवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास मुली पार्किंगमध्ये खेळत असताना आरोपीने मुलींना चॉकलेट देऊन त्यांचा हात पकडून अश्लील कृत्य करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार समजताच महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

Leave A Reply

Your email address will not be published.