Pune Cheating Fraud Case | पुणे : प्लॉटींगच्या व्यवसायात पावणे दोन कोटींची फसवणूक, 12 जणांवर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | प्लॉटींगच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून विक्री केलेल्या प्लॉटमधून मिळणाऱ्या नफ्यापैकी 50 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 64 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2019 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत विश्वविनायक डेव्हलपर्सच्या हांडेवाडी येथील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत युवराज बाळासाहेब घावटे (वय-35 रा. गणेश निवास, भवानी पेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उत्तम दामोदर शेवाळे, गौतम शेवाळे, अंकुश शेवाळे, वैभव शेवाळे, सुजाता शेवाळे, गौरत शेवाळे, केतकी शेवाळे,माधुरी शेवाळे यांच्यासह इतर चार जणांवर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या जागेत प्लॉटींग करण्याबाबतचा समजुताची करार दाखवून 67 प्लॉट पडणार असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. एक प्लॉट 10 लाख 75 हजार रुपयांना विकणार असल्याचे सांगितले. या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापैकी 50 टक्के नफा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांना प्लॉटींगच्या व्यवसायात 40 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवले.

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना 20 लाख रुपये परत केले. उर्वरित रकमेवर प्रति गुंठ्याप्रमाणे व व्याज असे मिळून 1 कोटी 64 लाख 7 हजार 500 रुपये आरोपींनी फिर्यादी यांना न देता आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीची जमीन उल्हास शेवाळे याला परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Pune Pimpri Chinchwad Crime News | तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार
Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

Leave A Reply

Your email address will not be published.