Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यवसाय सुरु करुन देण्याच्या बहाण्याने 30 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | व्यवसाय सुरु करुन देतो तसेच त्यातुन फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 30 लाखांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार काळेपडळ येथे नोव्हेंबर 2011 ते जून 2022 या कालावधीत घडला असून याप्रकरणी कल्याण येथील एकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत नरेंद्र धर्मा भगतकर Narendra Dharma Bhagatkar (रा. सुप्रीम ग्रीनवुड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गौतम शिवाजी मोरे Gautam Shivaji More (रा. कल्याण जि. ठाणे) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम मोरे याने फिर्यादी नरेंद्र भगतकर यांना व्यवसाय (Business) सरु करुन देतो तसेच त्यातुन फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवले. व्यवसाय सरु करुन देण्यासाठी मोरे याने फिर्यादी यांच्याकडे वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार भगतकर यांनी आरोपीच्या आरोग्य भारती या कंपनीच्या कोटक महिंद्रा बँकेच्या अमरावती येथील खात्यात पैसे जमा केले. मात्र, आरोपीने कोणताही व्यवसाय सुरु करुन दिला नाही तसेच पैसे परत न करता 30 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.जी. थोरात (API S.G. Thorat) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.