Nashik Police | नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसारित केला WhatsApp नंबर

0

नाशिक : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Nashik Police | नागरिकांना आपला अभिप्राय नोंदवता यावा तसेच काही सूचना असल्यास त्यादेखील मांडता याव्यात यासाठी नाशिक शहर पोलीस (Nashik Police) आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही व्यक्तीला या व्हॉट्सअॅप नंबरवर अभिप्राय, सूचना करता येऊ शकतात.

https://x.com/nashikpolice/status/1739687436714680778?s=20

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर शहराचा आढावा घेतला आणि कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहर (Nashik Police) सुरक्षित कसे करता येईल, याकडे ते लक्ष देत आहेत. पोलिसांनी एका बाजूला संपुर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) सुरू असून आता अभिप्राय व सूचनांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांना आपला अभिप्राय नोंदवता यावावा त्याचप्रमाणे काही सूचना असल्यास त्यादेखील मांडाता याव्यात यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर (WhatsApp Number) प्रसारीत करण्यात आला आहे. जेणेकरून नागरिक व पोलीस यांच्यातील योग्य सुसंवाद शहर भयमुक्त करण्यासाठी व शहराच्या विकासासाठी कायमच उपयुक्त ठरेल.

नागरिकांसाठी हा व्हाटट्सअप क्रमांक हा फक्त आपला अभिप्राय (Feedback) व सूचना (Suggestions) देण्यासाठीच आहे.
यावर कुठल्याही प्रकारचे संभाषित कॉल स्वीकारले जाणार नाहीत, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त यांनी सुरू केलाला व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील सुरक्षेबाबत सूचना आणि
अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकतात.

सुरक्षित नाशिकसाठी आपले इनपुट / अभिप्राय /सुचना आम्हाला कळवा… फक्त मेसेजव्दारे – या नंबरवर कॉल करू नका.
व्हॉट्सअ‍ॅप मेसेज नंबर हा आपत्कालीन प्रतिसाद नंबर नाही. आपल्या तक्रारी/ आपत्कालीन परिस्थीतीसाठी 112 वरच
कॉल करा. 112 हा आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली नंबर आहे. नागरिकांनी अभिप्राय /सुचना ९९२३३२३३११ या क्रमांकावर
कळवाव्यात असे आवाहान करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.