Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; वाघोली परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू (Pune Accident News) झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) सोमवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास वाघोलीतील भावडी रोडवर घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राहुल मोहन डुकळे (वय-19 रा. गायरान, गोरेवस्ती, वाघोली) आणि रावसाहेब सिद्धाजी माने (वय-21 रा. रामनगर लोणीकंद) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल डुकळे याच्यावर आयपीसी 304अ, 279, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल बबन गिरमे Police Constable Amol Girme (वय-24) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल डुकळे हा त्याच्या मित्रासोबत दारु पिऊन दुचाकीवरुन भरधाव वेगात जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या रावसाहेब माने याच्या दुचाकीला राहुलच्या दुचाकीची जोरात धडक बसल्याने तिघेजण सिमेंटच्या रस्त्यावर पडले. यात गंभीर जखमी होऊन राहुल डुकळे व रावसाहेब माने यांचा मृत्यू झाला.

रावसाहेब माने हा फूड डिलिव्हरी (Food Delivery) करण्याचे काम करत होता. तो फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात होता.
त्यावेळी राहुल याच्या दुचाकीची धडक माने याच्या दुचाकीला बसली. त्याच्या पश्चात आई-वडिल विवाहित बहिण
असा परिवार आहे. तर आरोपी मयत राहुल टेम्पो चालवण्याचे काम करत होता. त्याला रुग्णालयात नेत असताना
त्याचा वाटेत मृत्यू झाला. दोघेही अविवाहित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केदारी (PSI Kedari) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.