Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला घरात नेऊन अश्लील चाळे, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पुण्यातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मैत्रिणीसोबत लपाछपी खेळत असताना एका अल्पवयीन (Minor) 11 वर्षीय मुलीला जेम्सच्या गोळ्या देऊन घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation) केला. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास दत्तनगर परिसरातील एका कॉलनीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 38 वर्षीय आईने मंगळवारी (दि.26) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अमर मोहन भोसले Amar Mohan Bhosale (वय-27 रा. दत्तनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी तिच्या मित्र मैत्रिणीसोबत लपाछपी खेळत होती.
त्यावेळी मुलगी जिन्यात लपली असताना आरोपीने तिला जेम्सच्या गोळ्या खाण्यास दिल्या.
त्यानंतर तिला घरात बोलववून घेऊन तिला किस करुन तिच्यासोबत अश्लील चाळे केले.
मुलीने त्याला ढकलून देऊन घरातून पळून गेली. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन तिला जिन्यात अडवले. याबाबत कोणाला काही सांगू नको आपल्यात सिक्रेट राहू दे असे म्हणून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पीडित मुलीने आईला सांगितले. आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.