Pune PMC News | पाणीपट्टी थकविणारी शासकिय कार्यालये व कॅन्टोंन्मेंट बोर्डचा पाणी पुरवठा बंद करणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune PMC News | शासकिय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत लवकरच महापालिका Pune Municipal Corporation (PMC) कडक पावले उचलणार आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी संबधित संस्थांना नोटीसेस पाठविण्यात येणार असून ३१ जानेवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिले आहेत. (Pune PMC News)

शहरामध्ये केंद्र (Central Govt) व राज्य शासनाची (State Govt) अनेक कार्यालये आहेत. तसेच रेल्वेसह पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट (Khadki Cantonment) आहेत. या सर्वांना महापालिका पाणी पुरवठा (PMC Water Supply) करते. या सर्व विभागांकडे मोठ्याप्रमाणावर पाणीपट्टी थकली आहे. ही थकबाकी भरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. परंतू म्हणावसा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी पुन्हा एकदा सर्व थकबाकीदार संस्थांना नोटीसेस पाठविण्यात येणार आहेत. येत्या ३१ जानेवारीपर्यंत ही थकबाकी भरण्याचे आदेश देण्यात येतील. ती न भरल्यास पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

शासकिय संस्थांकडील थकबाकी विरोधात महापालिकेने मागीलवर्षी देखिल विशेष मोहीम राबविण्यात आली होती. एकट्या पुणे कॅन्टोंन्मेंटकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मागीलवर्षी कॅन्टोंन्मेंटचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यादिवशी कॅन्टोंन्मेंटने तातडीने दोन कोटी रुपयांची थकबाकी भरली. परंतू यानंतर मात्र पुन्हा थकबाकी भरण्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती अन्य संस्थांबाबत असल्याने यावेळी मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. (Pune PMC News)

फुरसुंगीचा पाणी पुरवठा ३१ जानेवारीपर्यंत सुरू होणार

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या माध्यमांतून देवाची उरूळी, फुरसुंगी आणि मंतरवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी योजना करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेनेही निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेतील पाईपलाईन, साठवण टाकी आणि जलकेंद्राचे काम झाले असले तरी रेल्वे लाईन ओलांडून टाकाव्या लागणार्‍या मुख्य वाहीनीच्या कामाला परवानगी मिळत नसल्याने काम रखडले होते. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर हे काम जवळपास पुर्णत्वास आले आहे. तसेच फुरसुंगी परिसरासाठी मुठा उजवा कालव्यातून पाणी उचलण्यात येते.

यासाठी कालव्यात पाणी सोडावे लागते. यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
या पार्श्‍वभूमीवर लष्कर जलकेंद्रातून थेट पाईपलाईन करून फुरसुंगीसाठी पाणी पुरवठा
करण्यात येणार आहे. यासाठीच्या पाईपलाईनचे देखिल काम पुर्ण झाले आहे.
पुढील महिन्याभरात जलकेंद्रावर पंप बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
त्यानंतर देवाची उरूळी, फुरसुंगी व मंतरवाडीला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत या कामाची पाहाणी आज करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.