Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहत असलेल्या 7 आणि 8 वर्षाच्या दोन मुलींचा याच परिसरात राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी (दि. 22) रात्री विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार या मुली राहत असलेल्या इमारतीच्या जवळ असलेल्या मोकळ्या पटांगणामध्ये घडला. अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिका विरुध्द विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 39 वर्षीय वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) रविवारी (दि.24) फिर्याद दिली आहे. यावरुन मोरेश्वर काणे Moreshwar Kane (वय-60 रा. कर्वेनगर) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 7 वर्षाची मुलगी व त्यांच्या घराशेजारी राहणारी 8 वर्षाची मुलगी
फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात असलेल्या बुद्धविहार समोरील मोकळ्या पटांगणात इतर मुलींसोबत खेळत होत्या.
त्यावेळी आरोपी मोरेश्वर काणे याने फिर्यादी यांची मुलगी व शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत अशोभनिय वर्तन केले.
यानंतर या दोन पीडित मुली घराच्या पार्किंमध्ये उभ्या केलेल्या रिक्षामध्ये खेळत होत्या.
त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन मुलींचे चुंबन घेऊन गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.