Uttam Jankar On Ajit Pawar | उत्तम जानकारांची अजित पवारांवर खोचक टीका, ७७ हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्यांना चुना लावून बगळा केलं

0

माढा : Uttam Jankar On Ajit Pawar | तुमच्या पक्षात असताना राम आणि आता तो दहशतवादी. ७७ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेल्यांना चुना लावून बगळा केलं आहे. संघर्ष माझ्या रक्तात आहे. अजितदादांसारखे माझे नाही, गंगेचं पाणी सोडून गटारीचे पाणी प्यायला गेले. वाचले तर फक्त गडकरी (Nitin Gadkari) नाहीतर सगळं सुफडा साफ होणार आहे. सब कुच जल गया अब बाचा क्या है, अशी टीका उत्तम जानकर यांनी माढा (Madha Lok Sabha) येथील सभेत बोलताना केली.

माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Candidate) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. सभेला जयंत पाटील (Jayant Patil), राजेश टोपे (Rajesh Tope), बाबासाहेब देशमुख तसेच भूषणसिंह होळकर उपस्थित होते. यावेळी जानकर बोलत होते.

उत्तम जानक म्हणाले, गुरुच्या नंतर सभा करायची नसते, म्हणून पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यापूर्वी सभा करुन गेले. गेल्यावेळी चूक केली म्हणून आता माढा जिंकून प्रायश्चित करणार आहे. विठ्ठल आमची काळजी घेईल तोही आमचा देव आहे, असे जानकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.