Pune Kondhwa Police News | कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरांना अटक, 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस (Video)

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Kondhwa Police News | कोंढवा पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहनांची तपासणी करताना दोन वाहन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे सखोल तपासाअंती परिसरातील वाहन चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. (Pune Kondhwa Police News)

दि. 12 डिसेंबर 2023 रोजी पोलिस सागर भोसले आणि संतोष बनसुडे हे कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. पिसोळी येथील आंबेकर हॉटेल चौकात त्यांना एक व्यक्ती निळया रंगाच्या यामाहा दुचाकीवर बसलेला दिसला. त्या यामाहावरील नंबर खोडलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला यामाहा गाडीसह पोलिस स्टेशनला आणले. (Pune Kondhwa Police News)

सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dineshkumar Patil) यांनी सदरील बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांना कळविले. वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनी ताब्यात घेतण्यात आलेल्या सोहेल मन्सुर पोटोदे (19, धंदा – गॅरेजकाम, रा. शिवतीर्थनगर, थेरगाव, पुणे) याच्याकडे सखोल तपास केला. त्याने एका अल्पवयीन साथीदारासह मिळुन 6 वाहने चोरल्याची कबुली केली. अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहने चोरीचे 5 आणि लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाहन चोरीचा एक असे एकुण 6 गुन्हे उघडकीस आणले.

दि. 13 डिसेंबर 2023 रोजी पेट्रोलिंग करीत असताना सौरभ राजेंद्र भोसले (23, रा. कोर्टी, सवडी, जि. सोलापुर) हा एका दुचाकीवर बसला होता. त्याला पोलिसांनी हटकले असता तो पळुन जात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिस स्टेशनला आणले. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली असता त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी एकुण 8 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma),
पोलिस उपायुक्त आर. राजा (DCP R Raja), सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराव साळवे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले (PI Sandeep Bhosale),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख
सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Patil),
सहाय्यक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde), पोलिस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन आणि शाहीद शेख यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.