Pune Pimpri Chinchwad Crime News | सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

Molestation Case

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सिनेमा स्टाईल पाठलाग करून तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा भर रस्त्यात हात पकडून गैरवर्तन केल्याप्रकरणी तीन अनोळखी तरुणांवर वारजे माळवाडी पोलीस (Pune Police) ठाण्यात रविवारी (दि.24) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 36 वर्षीय वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी तीन अनोळखी तरुणांवर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत्या घरापासून जवळच असलेल्या
एका सोसायटीत पठण क्लासला पायी जात होती. त्यावेळी तीन आरोपींनी तिचा पाठलाग केला.
त्यापैकी एका तरुणाने फिर्यादी यांच्या मुलीचा स्कार्फ ओढला.
तसेच तिचा हात पकडून गैरवर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. याबाबत पीडित मुलीने घरात सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा