Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाने खुशखबर दिली आहे. येत्या २४, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरच्या रात्री, वाईन शॉप (Wine Shop) मध्यरात्री १ पर्यत सुरू राहणार आहेत. तर बीअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना ख्रिसमस (Christmas) आणि थर्टीफर्स्ट (31 December Party) धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. (Pune News)
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी २४, २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरातील वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तसेच बीअर बारला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. (Pune News)
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (ख) (सी), कलम १४२ (२), (एच-ख) (आयव्ही) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ तसेच ३१ डिसेंबरला राज्यातील मद्यविक्री परवानाधारक वाईन शॉप तसेच बीअर बार रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…
- Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.
- Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.
- Healthy Benefits Of Curry Leaves | रोज सकाळी रिकाम्या पोटी करा कढीपत्त्याचे सेवन, हृदयाच्या आरोग्यापासून मधुमेहापर्यंत सर्व रोग राहतील नियंत्रणात.