Pune Pimpri Chinchwad Crime News | पैशासाठी विवाहितेचा छळ, खडकवासला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | घरबांधणीसाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्यास सांगून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police) पती, सासरे आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 35 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी पती अतुल भानुदास गुंजाळ (वय-35), सासरे भानुदास आण्णासाहेब गुंजाळ, सासु लक्ष्मी भानुदास गुंजाळ (वय-56 तिघे रा. विश्रांतवाडी) यांच्यावर आयपीसी 307, 498अ, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 4 मे 2022 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पती हे पतीपत्नी आहेत. आरोपींनी संनमत करुन फिर्यादी यांना घरबांधणीसाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्यास सांगून महिलेला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.
आरोपी पती अतुल गुंजाळ याने महिलेला फ्लॅटच्या गॅलरीमधून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला.
तसेच खडकवासला धरण परिसरात फिरायला घेऊन जावून महिलेला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न(Attempt to kill)
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी (API Mali) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.