Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणातून महिलेला अश्लील शिवीगाळ, पतीला जीवे मारण्याची धमकी; कोथरुड परिसरातील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) केली. तसेच नाना पेठेतील पोरं आणून नवऱ्याचा मर्डर केला पाहिजे, असे म्हणत महिलेला तिच्या पतीला जीवे मारून टाकण्याची धमकी (Threats to kill) दिली. याप्रकरणी एकावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) दुपारी एक ते दोन च्या दरम्यान कोथरुड येथील दौलत हौसिंग सोसायटीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत अनुजा नितीन पवार (वय-37 रा. दौलत हौसिंग सोसायटी, कर्वेरोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत जाधव (रा. दौलत हौसिंग सोसायटी, कर्वेरोड, कोथरुड) याच्यावर आयपीसी 509, 506/2 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एका परिसरात राहतात.
त्यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्य़ादी पॅसेजमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी एकट्या असल्याचे पाहून जुन्या भांडणाच्या वादातून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच नाना पेठेतील पोरं आणून नवऱ्याचा मर्डर (Murder) केला पाहिजे, असे बोलुन धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे (Police Constable Sonwane) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- कठीण वस्तूने डोक्यात वार करुन वेटरचा खून, पुण्यातील घटना
- पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानं उचललं टोकाच पाऊल, रेल्वेखाली येत संपवलं जीवन
- खड्डेमुक्त जंगली महाराज रस्त्याच्या मेन्टेनन्ससाठी 2 कोटी रुपयांची निविदा
- पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक
- तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार
- कोंढवा पोलिसांकडून 7 पिस्तुलांसह 24 काडतुसे जप्त, 3 सराईत आरोपींना अटक